कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धासमजले पाहिजे

नक्की वाचा.आणि बायकोला वाचायला द्या
आपण ह्यातून कोणाला निवडाल?……
मोठ्यांच्या रात्रीच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ
खेळण्यास सांगतात.
सर्वजन उत्सुकतेने विचारतात
"कोणता खेळ सर?"
शिक्षक एका विध्यार्थ्याला
मदत करायला विनंती करतो.
संगीता नावाची एक
स्त्री पुढे येते. .
शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात
महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात.
संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची,  मित्र-मैत्रिणींची
आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते.
शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून
टाकण्यास सांगितली कि जी तिच्या
दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत.
संगीताने
आपल्या मित्रांची नावें पुसली.
आता शिक्षकाने
तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि
ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें
पुसावायास लागली.
हा सिलसिला असाच पुढे
चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें
पुसायची बाकी राहिली होती.
जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची
ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलगा.
संपूर्ण वर्ग आता निस्तब्ध झाला होता कारण
त्यांना कळून चुकले होते कि ह्यापुढचा खेळ
संगीताला फार कठीण जाणार आहे.
तिला आता
सर्वात कठीण असा निर्णय घेणे भाग पडणार आहे.
शिक्षकाने आता तिला तिच्यापुढील दोन नावें
पुसण्यास सांगितली.
मोठ्या नाईलाजाने आणि जड अंतःकरणाने तिने
आपल्या आई वडिलांची नावें पुसून टाकली. "
अजून एक
नांव पुसून टाक" शिक्षकाने फर्मावले.
संगीता आता
पूर्णपणे हवालदिल, निराश झाली होती.
थरथरत्या हाताने तिने मुलाचे नाव पुसले
आणि
ओक्साबोक्शी रडायला लागली.
शिक्षकाने संगीताला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगितले.
थोड्या वेळाने जेव्हा तिचे दु:ख
आवरले तेव्हा तिला विचारले कि आई, वडील वा
मुलगा ह्यापैकी एकाचे नाव तिने का नाही ठेवले
तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती
म्हणून नवऱ्याऐवजी, ती आई किंवा वडिलांचे नाव ठेवू
शकली असती
कारण त्यांनी तिला जन्म देऊन
लहानाचे मोठे केले होते किंवा ज्याला तिने जन्म
दिला अशा तिच्या मुलाचे नाव ती शेवटी ठेवू
शकली असती.
मग नवराच का तिच्या जीवनातील
सर्वात महत्वाची व्यक्ती तिला वाटली?
टाचणी पडली तरी आवाज येईल अशी स्मशान
शांतता वर्गात पसरली होती आणि सर्वजण आता
संगीता काय उत्तर देते ह्याकडे कान टवकारून वाट बघत
होते.
संगीता तिच्या जागेवरून उठून उभी राहिली
आणि सावकाश म्हणाली
"एक दिवस माझे आई-वडील
मला सोडून जातील. माझा मुलगा सुद्धा मला सोडून
जाईल त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी,  लग्ना नंतर वा
तत्सम काही कारणांमुळे.
तेव्हा शेवटी माझ्याबरोबर
राहील तो माझा नवरा ज्याच्या बरोबर मी माझे
उभे आयुष्य व्यतीत केले आहे.
" सर्वानी उभे राहून
टाळ्यांच्या गडगडातात तिच्या उत्तराचे स्वागत केले.
आपण आपल्या जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, ते
आपल्या आयुष्यात येतात आणि जातात.
काहीजण थोड्या वेळापुरते आपल्या बरोबर असतात तर
काहीजण शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात.
तेव्हा आपल्या सर्व नात्यांचा आदर राखणे हे आपले
आद्य कर्तव्य आहे पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या
कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धा
समजले पाहिजे.....


Comments

  1. खुप छान आहे.....

    http://achiseekh.com

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आठवण [ Marathi Kavita ]

आठवणी श्रावणातल्या....