पावसाळ्यातील आहार कसा असावा!
पावसाळ्यातील आहार कसा असावा !
जेवण करण्यात आणि ते पचविण्यात जठराची मुख्य भूमिका असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद होतो. म्हणूनच या काळात जास्त जेवल्यास ते नीट पचत नाही. म्हणूनच पावसाळ्यात पचनासंदर्भातील आजार होऊ नये यासाठी आहार काळजीपूर्वक घेतला पाहिजे.जड जेवण टाळावे. हल्के, ताजे आणि पचनास योग्य असाच आहार घ्यावा.
संध्याकाळी लवकर जेवावे. त्यामुळे पचन सुलभपणे होते.
या काळात पाणी गढूळ असण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छ पाणी आपण पितोय ना याची काळजी घ्यावी.
अस्वच्छ पाण्याने अतिसारासह अनेक रोग होऊ शकतात.
आंबे नीट धुऊन खावेत.
जांभूळ आणि मक्याचे भुट्टे खाणे या काळात चांगले.
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे विशेषतः मुलांचा त्यापासून बचाव करावा.
पावसाळ्यातील रोग
फोड- पावसाळ्यात पाण्यामुळे चर्मरोग होण्याची शक्यता असते. सारखे पाण्यात भिजल्याने वा चिखलात गेल्याने चिखल्या होतात. त्यासाठी अशा ठिकाणी निंबाची साले रगडावीत. पिंपळाच्या पानावर तूप लावून त्याला थोडे गरम करून फोडांवर लावल्यास आराम मिळतो.
कोरडा खोकला- एलर्जी व थंडीमुळे हा खोकला होतो. त्यासाठी एंटीहिस्टेमाईनचा उपयोग करावा. तेलकट पदार्थ टाळावेत. कारण त्यामुळे गळ्याला संसर्ग होऊ शकतो.
सर्दी- पावसाळ्यात सर्दी होणे यात काही विशेष नाही. पण म्हणूनच सर्दी झाल्यानंतर काळजी घ्यावी. एक कप पाण्यात आले टाकून ते उकळावे. त्यात एक चमचा मध टाकून ते घ्यावे. असे दोनदा प्यायल्यास सर्दी लवकर बरी होते.
Comments
Post a Comment