आठवणी श्रावणातल्या....

लग्नाआधी गावातली प्रत्येक मुलगी वा तिच्या मैत्रिणी एखाद्या ठराविक झाडाखाली बागडलेल्या असतात, त्याच्या सावलीत वाढलेल्या असतात. लग्नानंतर क्वचितच त्या पुन्हा तिथे येतात. काही काळाने चुकून एखाद्या वेळेस आपल्या मुलाबाळांना गावाकडे घेऊन आल्या की कुणी हौसेने वा कुणी आवर्जून तर कुणी एक अनाहूतपणे त्यांना ते झाड दाखवतात. त्या वर्षी ते झाड तरतरून जाते. मात्र दर वर्षीच्या श्रावणात ते झाड आपल्या अंगाखांद्यावर खेळलेल्या, आपल्या सावलीत वाढलेल्या त्या पोरीबाळींच्या आठवणीत अश्रू ढाळते. आणि लोक म्हणतात, श्रावणातल्या पावसाची बात काही और असते ! तो मनमुराद कोसळतो !
खरेच तो मनमुराद कोसळतो आणि झाडांच्या अश्रूंची ओल संगे घेऊन आपलंही मन हलकं करतो !
झाडे बोलत असतात, ऐकत असतात ! त्यांचाही जीव असतो, त्यांचेही मन असते !
तुम्ही एखाद्या झाडाशी बोलला आहात का कधी ?
नाही का ?.... मग तर त्याच्याशी नक्की बोला, ते तुम्हाला अलगद कवेत घेईल, तिथली पानेफुले तुमच्या भोवती फेर धरतील.
गावाकडच्या झाडासाठी तुम्हाला सांगावा धाडायचाय का ? होय ! तर मग तुमच्या नजीकच्या झाडास हळुवार मिठी मारून बघा ! इकडे त्या झाडाच्या वठलेल्या बुंध्यावर पालवी फुटेल !
आभारी आहे..
- समीर गायकवाड. सर
मंगल भोसले.

Comments

Popular posts from this blog

आठवण [ Marathi Kavita ]

कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धासमजले पाहिजे