कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धासमजले पाहिजे
नक्की वाचा.आणि बायकोला वाचायला द्या आपण ह्यातून कोणाला निवडाल?…… मोठ्यांच्या रात्रीच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ खेळण्यास सांगतात. सर्वजन उत्सुकतेने विचारतात "कोणता खेळ सर?" शिक्षक एका विध्यार्थ्याला मदत करायला विनंती करतो. संगीता नावाची एक स्त्री पुढे येते. . शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात. संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची, मित्र-मैत्रिणींची आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते. शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून टाकण्यास सांगितली कि जी तिच्या दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत. संगीताने आपल्या मित्रांची नावें पुसली. आता शिक्षकाने तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें पुसावायास लागली. हा सिलसिला असाच पुढे चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें पुसायची बाकी राहिली होती. जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलगा. ...